InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

ताबा सुटला अन् अपघात झाला ; ३ ठार, १ जखमी

- Advertisement -

नगर- पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जखमी.आहे. जखमीला जवळील रुग्णायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमधील सर्वच व्यक्ती हे धुळ्याचे रहिवाशी होते.

- Advertisement -

पुणेकडून नगरकडे जाणाऱ्या रोडवर जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रक MH 22 AA 524 वर पाठिमागून आलेल्या स्कार्पिओ नंबर MH 18 AJ 8443 या गाडीने जोराची धडक दिली. पहाटेच्या झोपेत चालकाचे गाडीवरल नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात तीन जण ठार झाले व एक जखमी झाला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसलेसह इतर कर्मचारी घटनास्थळी  पोहचल्यानंतर त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती.

मृत झालेल्या व्यक्तींची नावे-
1) ओझायर तसनीय अख्तर अन्सारी वय-30 रा.फिरदोस नगर,धुळे
2)फैसल गुलाब रब्बाली अन्सारी वय-20 रा.मछली बाजार ,धुळे
3)इरफान शयशोदोहा अन्सारी वय-20 रा.मछली बाजार ,धुळे
जखमी-
1)अदनान निहाल अन्सारी वय-21रा. तिरंगा चौक ,धुळे

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.