InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

’26/11 हल्ला तत्कालीन यूपीए सरकारच्या संगनमताने’

मुंबईवरच्या ताज हॉटेलवर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान आणि तत्कालीन यूपीए सरकारच्या संगनमतानं झाल्याचा गंभीर आरोप आर. वी.एस  मणी यांनी केला आहे. कारण त्यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयातील जास्त करून अधिकारी दहशतवादावर होणाऱ्या वार्षिक गृह सचिवस्तरावरच्या चर्चेसाठी इस्लामाबादला होते.

ते म्हणाले, हिंदू दहशतवाद ही एक जाणूनबुजून निर्माण करण्यात आलेली संकल्पना आहे. ही संकल्पना त्यावेळच्या केंद्र सरकारमधील काही मोठे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून पसरवली होती. त्यानंतर त्याचे पुरावे शोधण्यात आले. केंद्र सरकारचा काय उद्देश होता ते माहीत नाही. पण त्यामुळे खरे दहशतवादी पळून गेले. मणी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीनं पुस्तक ‘हिंदू टेरर- इनसायडर अकाउंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर’च्या प्रकाशनादरम्यान हे विधान केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply