InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अरविंद केजरीवाल यांनी पाठवली गौतम गंभीरला नोटीस

आप उमेदवार आतिशी यांच्यासंदर्भात वादग्रस्त पत्रके वाटल्याचा आरोप आपने गौतम गंभीरवर केला होता. त्यानंतर गौतम गंभीरने केजरीवाल करताना म्हटले की, मला लाज वाटते की, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी केजरीवाल यांच्या सारखा व्यक्ती बसलेला आहे. तुम्ही अत्यंत घाणेरडे मुख्यमंत्री असून तुमच्याच झाडूने तुमचा मेंदू साफ करण्याची गरज आहे. आम आदमी पक्षाचे चिन्ह झाडू असून त्यावर गंभीरने केजरीवाल यांच्यावर टीका होती.

या वक्तव्यावरून अरविंद केजरीवाल यांनी गंभीरला नोटीस बजावली आहे.  24 तासाच्या आत, उत्तर देऊन माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली आहे. या नोटीसमुळे गंभीरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.