InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांविरोधात अ.भा.छावा संघटनेचे चकवा आंदोलन

पैठण / किरण काळे- भाजप सरकारच्या फसव्या घोषणा व मंञी, खासदार, आमदार व भाजपच्या पुढार्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांच्या विरोधात पैठण तहसिल कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चकवा आंदोलन करून निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपच्या फसव्या घोषणा व पुढार्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांचे हातात विविध फलक घेत कार्यकर्त्यांनी लक्ष वेधुन घेतले होते.
भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

भाजपच्या नेत्यांनी सत्तेत येण्याआगोदर शेतकरी, विद्यार्थी, मोल मजुरी करणारे कामगार यांना न्याय देऊ म्हणता सत्ता काबीज केली व सत्तेत आल्यानंतर खोटी अश्वासने देऊन जनतेची फसवणुक केली. भाजप पक्षाच्या अनेक नेत्यांनी अकलेचे तारे तोडत शेतकरी, महिला, विद्यार्थी, भारतीय जवानांच्या कुटुंबियाविषयी बेताल वक्तव्य करून सर्व समाज बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या. त्या विरोधात अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने चकवा आंदोलन करून भाजप सरकारच्या बेताल बादशहा पुढार्यांचा निषेध केला.

भाजपच्या पुढार्यांनी केलेल्या बेताल वक्तव्य व दिलेल्या फसव्या घोषणांच्या विरोधात निद्रीस्त सरकारला जागे करण्यासाठी आम्ही चकवा आंदोलन केले असुन येथुन पुढे जर असे वक्तव्य केले तर त्यांना त्यांची जागा दाखवुन भाजपच्या पुढाऱ्यांना अ.भा.छावा संघटना जिल्ह्यात फिरू देणार नाही. किशोर शिरवत पाटील- जिल्हाध्यक्ष अ.भा छावा संघटना औरंगाबाद.

यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर एरंडे, जिल्हा सचिव संजय मोरे, पैठण तालुकाध्यक्ष किशोर सदावर्ते यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.