शिवप्रेमींच्या संतापापुढे भाजपने टेकले गुडघे; वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे आदेश

यांची तुलना यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वादंग सुरु होतं. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत होते. राज्यातील अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. यानंतर अखेर भाजपने हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश भाजपने दिले आहे. यामुळे या वादग्रस्त पुस्तकावरुन सुरु झालेला वाद लवकरच मिटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने हे पुस्तक लिहिले असून त्यांनी ट्विट करून पुस्तक प्रदर्शित केल्याची माहिती दिली होती.  हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात येणार असल्याचं भाजपचे नेते श्याम जाजू यांनी सांगितले.

चिडचीड करण्यापेक्षा राजीनामा देऊन भूमिका घ्या-

“महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा कोल्हापूरचे जे वंशज आहेत. ते सर्व भाजपमध्ये आहेत. त्यामुळे मग या दोन्ही गाद्या आहेत त्यांचा महाराष्ट्राला सन्मान आहे त्या प्रमुख लोकांनाही शिवाजी महाराजांची तुलना योग्य आहे की नाही याबद्दल भूमिका घ्या असे जर मी म्हटलं किंवा जनतेने सांगितलं तर चिडाचीड करण्याचे कारण नाही. तुमची नेमणूक भाजपने केली. कोणी भाजपचे आमदार आहेत. कोणी खासदार आहेत. कोणी माजी खासदार आहे. तुम्ही वंशज आहात. त्याबद्दल आम्हाला आदर प्रेम आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान सन्मानाबद्दल आमच्यासारख्या सर्व सामान्यांनी लढायचं आम्ही लढू आम्ही शिवसैनिक आहोत. तुम्ही तर त्यांचे वंशज आहात. तुम्ही त्यांचे नातं सांगता. मग तुमची जबाबदारी सर्वात जास्त आहे. तुम्ही पटकन राजीनामे दिले पाहिजेत. देणार आहात का?

खासदार संभाजीराजे म्हणाले

‘उद्धवजी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घाला. ते प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करत आहेत. त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीमध्ये (सिंदखेड राजा) काय बोललो आहे ते. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही,’ असे या ट्विटमध्ये खासदार संभाजीराजे म्हणाले.

… अन्यथा भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही –

नरेंद्र मोदी यांना कदाचित महाराजांनी सूरतवर गाजविलेल्या पराक्रमाची सल त्यांना अजून बोचत असावी, म्हणून तसा प्रयत्न करून महाराष्ट्राचा अपमान करण्याची संधी ते शोधत असतात. याप्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध तर आहेच परंतु त्यांनी त्वरित याबाबत जनतेची माफीदेखील मागितली पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला पदाधिकारी भाजपाच्या कार्यकर्तेला रस्त्यावर फिरू देणार नाही”.

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करून घेणारे नरेंद मोदी यांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. छञपती शिवाजी महाराजांची तुलना कोणीही कुणाशीच करू शकत नाही, इतके ते महान आहेत”.

शेतकरी लुटून बरबाद करणारे मोदी, हे शिवाजी महाराज कसे होऊ शकतात?-

सात जन्म, सात पिढ्या झिजवून काढले तरी छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना होऊ शकत नाही. तुलनात्मक पुस्तक काढणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. अशी तुलना करण अत्यंत चुकीचे आहे. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले, त्या स्वराज्याचे हे केवळ पाईक आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

एकीकडे शेतकऱ्यांच्या देठालाही हात लावू नका म्हणणारे छत्रपती आणि दुसरीकडे अख्खा शेतकरी लुटून बरबाद करणारे मोदी, हे शिवाजी महाराज कसे होऊ शकतात?, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी – राज ठाकरे

शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज!; शरद केळकरने दिले पत्रकाराला उत्तर

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.