लावणी सम्रज्ञीच्या पक्ष प्रवेशावर वादंग?:राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष; प्रवीण दरेकर

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षवाढीसाठी तयारी सुरु केली आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहे. लावणी सम्राज्ञी तसेच आपल्या लावलीने रसिकांना साद घालणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली.

“राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. “या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा