Coriander Water | सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Coriander Water | टीम महाराष्ट्र देशा: जेवणाची चव वाढवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, आयरन इत्यादी तत्व माफक प्रमाणात आढळून येतात. कोथिंबीरसोबतच कोथिंबीरचे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीच्या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Coriander Water Benefits)

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी पिणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरीचे पाणी प्यायल्याने पोटावर साचलेले अतिरिक्त चरबी कमी होते. कोथिंबीरीच्या पाण्यात आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करतात.

रोगप्रतिारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Coriander Water Benefits)

नियमित सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहू शकते. कोथिंबिरीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने तुम्ही सर्दी-खोकला इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

शरीर थंड राहते (The body remains cool-Coriander Water Benefits)

उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतो. या परिस्थितीमध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी तुम्ही कोथींबीरीच्या पाण्याचे सेवन करू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने तुमचे शरीर थंड राहू शकते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन केल्याने पोटफुगीची समस्या सहज दूर होऊ शकते.

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरीच्या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकतात.

अंडी (Egg-For Hair Care)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्याचा समावेश करू शकतात. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते, जे केसांची काळजी घेण्यास मदत करते. नियमित एक ते दोन अंडी खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकतात. त्याचबरोबर तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकते. यासाठी तुम्ही उकडलेल्या अंड्याचे सेवन करू शकतात.

दूध (Milk-For Hair Care)

दुधामध्ये माफक प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्याचबरोबर दुधाचे नियमित सेवन केल्याने केसांसोबत शरीर देखील चांगले राहू शकते. नियमित दुधाचे सेवन केल्याने केस मजबूत होतात आणि केस गळती थांबते. त्याचबरोबर दुधाचे सेवन केल्याने केसांच्या वाढीस चालना  मिळते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुधाचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.