कोरोनाचा दणका ; औरंगाबादमधून UPSC परीक्षांना तब्बल 5 हजार परीक्षार्थींची दांडी

कोरोनाच्या संकट काळात राज्यात होऊ घातलेल्या UPSC परीक्षांना जबरदस्त फटका बसला आहे. UPSC परीक्षेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 5 हजार परीक्षार्थींनी दांडी मारली आहे.कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अवघ्या पैकी 5 हजार 572 उमेदवारांनीच परीक्षा दिली आहे.

UPSCसाठी जिल्ह्यातून 11 हजार 429 अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी 5 हजार 572 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. त्यामुळे कोरोनाचा मोठा फटका परीक्षेला बसल्याचं बोललं जात आहे. एकीकडे परीक्षांवर कोरोनाचा परिणाम दिसत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यात मराठा समाजाचं आंदोलन पार पडणार आहे.

आता MPSC परीक्षादेखील होणार आहेत. त्यावरही मराठा आंदोलकांनी कडक पवित्रा घेतला आहे. MPSCच्या परीक्षा जर पुढे ढकलल्या गेल्या नाहीत तर राज्यभर उग्र आंदोलन करू असा इशारा मराठा समाजाकडून करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.