कोरोनामुळे चाकण मार्केटमधील तरकारी विभागात शुकशुकाट

पुणे जिल्ह्यातील चाकण शहर व परिसरात कोरोनाने शिरकाव केला असून, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मधील एका आडत्याला कोरोना संक्रमण झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील संपूर्ण तरकारी विभाग बंद ठेवण्यात आला आहे.

लडाख वादानंतर अंदमान-निकोबार बेटांकडे खास लक्ष द्या ; प्रशासनाकडून नौदलाला सूचना

सलग चार दिवस म्हणजेच येत्या तीस जून पर्यंत बाजार बंद राहाणार असल्याचा निर्णय आडत्यांनी घेतला आहे. त्यामुळे चाकण येथे तरकारी बाजारात सध्या शुकशुकाट आहे.

पवारसाहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत , म्हणून.. ; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

गेल्या काही दिवसांपासून या मार्केट यार्ड मध्ये भल्या पहाटे शेतकरी, व्यापारी आदींची मोठी गर्दी होत होती. त्यातून मार्केट मधील एका आडत्याच्या संपर्कातील त्यांचे कुटुंबीय आणि परिसरातील पंधरा जणांना कोरोना संसर्ग झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे चाकण मार्केट मधील तरकारी विभाग बंद करण्यात आला असून या बाजारात सध्या शुकशुकाट आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.