नागपूरमध्ये कोरोनाची आतापर्यंत 133 जणांना लागण

नागपूर : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . राज्यात आतापर्यंत 9318 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आली. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य प्रशासन आपापल्यापरीने सर्वतोपरी मेहनत करताना दिसून येत आहेत.

नागपूरमध्ये कोरोनाची आतापर्यंत 133 जणांना लागण झाली आहे. नागपूरमध्ये कोरोनाने एकाचा बळी घेतला आहे. आतापर्यंत फक्त 39 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नागपूरकर आता कोरोनाच्या बाबतीत सतर्क झाले असून नागपूरकरांमध्ये आता कोरोनाची भीती पसरली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.