Corona In Maharashtra | राज्यात कोरोना निर्बंधबाबत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले…

Corona In Maharashtra | नागपूर : देशासह जगात अनेक ठिकाणी कारोना व्हायरस (Corona virus) ने पुन्हा थैमान घातले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ व्हायला लागली होती. रुग्णालय पुन्हा एकदा कोविड रुग्णांनी खचाखच भरायला लागली असून, मृत्यूच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ व्हायला लागली आहे. तर राज्यात (Maharashtra) देखील कोरोना विषाणू उफाळून आला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

देशासह राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोविड रुग्णसंखेत वाढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात करून नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे. ही टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना स्थितीबद्दल सरकारला सूचना देत राहील. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, पुन्हा निर्बंध, पुन्हा मास्क, पुन्हा लॉकडाऊन का? असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झाला आहे.

आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 2 नोव्हेंबर रोजी जगभरात 3.3 लाख कोविड रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली होती. त्यानंतर या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत गेली. हा आकडा डिसेंबर 18 नंतर 5.1 लाखांवर पोहोचला आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालेले आहे. सरकारकडून सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवण्यात आले आहे. दरम्यान, आज केंद्रीय स्तरावर याबाबत बैठक होणार असून, निर्बंध बद्दलची माहिती त्यानंतर समोर येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.