कोरोनामुळे आणखी एका मंत्र्यांच निधन; भाजपच्या पाचव्या आमदाराचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पूर नियंत्रण आणि महसूल राज्य मंत्री तसेच मुजफ्फरनगरचे चरथावल विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार विजय कश्यप यांचं मंगळवारी करोनामुळे निधन झालं. यापूर्वी भाजपाच्या चार आमदारांचा करोनामुळे मृत्यू झालाय.

विजय कश्यप यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. “भाजापा नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या विजय कश्यप यांच्या निधनामुळे खूप दु:ख झालं आहे. ते सर्वासामान्यांशी जोडलेले नेते होते. त्यांनी कायम लोकांच्या हिताची काम केली. या दु:खद प्रसंगी माझ्या सद्भावना त्यांच्या नातेवाईक आणि समर्थकांसोबत आहेत. ओम शांति,” असं ट्विट मोदींनी केलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विजय कश्यप यांच्या निधनानंतर ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. “विजय कश्यप एक लोकप्रिय नेते होते. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री म्हणून त्यांनी आपली कर्तव्य कायमच कौशल्यपूर्वक पद्धतीने पार पाडली. कश्यप यांच्या निधनामुळे जनतेने त्यांचं हीत जपणारा एक नेता गमावाला आहे,” असं योगी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कश्यप यांच्या आत्म्याला शांती मिळो असं म्हणत आपल्या सद्भावना कश्यप यांच्या नातेवाईकांसोबत असल्याचं सांगितलं.

याआधी, रायबरेलीमधील सलोन विधानसभेचे भाजपा आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी, ओरैया विधानसभेचे भाजपा आमदार रमेश दिवाकर, लखनौ पश्चिम विधानसभेचे सुरेश श्रीवास्तव, बरेलीच्या नवाबगंजमधील आमदार केसर सिंह गंगवार यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे. केसर सिंह गंगवार यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने फेसबुकवरून मोदी आणि योगी सरकारवर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा