बुलढाणामध्ये 24 जणांना कोरोनाची बाधा

बुलढाणा : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . राज्यात आतापर्यंत 9318 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आली. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य प्रशासन आपापल्यापरीने सर्वतोपरी मेहनत करताना दिसून येत आहेत.

बुलढाणा मध्ये 24 जणांना कोणाची बाधा झाली आहे बुलढाणामध्ये याअगोदर एका रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 16 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बुलढाणा प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले असून सरकार सोबतच बुलढाणा प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना दिसत आहे. सध्या नागरिकांमध्ये कोरोनाच्या पार्श्ववभूमी भीतीचे वातावरण आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.