Corona Update : राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण !

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या पत्नी नयना कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकूण बारा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने लोकांच्या संपर्कात येत आहे. अनेक कार्यक्रमाला देखील बच्चू कडू यांनी हजेरी लावली होती. अशातच बच्चू कडूंना थोडा अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली.

त्यामुळे बच्चू कडू हे अकोला किंवा अमरावती येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे सध्या अचलपूर वरून अमरावतीच्या दिशेने रवाना झाले असून पुढील उपचारासाठी कुठल्या शासकीय रुग्णालयात दाखल होतात हे अजून गुलदस्त्यात आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.