अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष जो बायडन यांना देण्यात आली कोरोना प्रतिबंधात्मक लस, टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे मानवी जीवन विस्कळीत झाले आहे. यानंतर आता जगभर कोरोणाची लस शोधण्याची मोहीम सुरू होती. यावरच अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांना कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.

78 वर्षीय बायडन यांना तूर्तास कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. याचं थेट प्रक्षेपणही करण्यात आलं. जो बायडन हे कोरोनाच्या हाय रिस्क प्रवर्गात मोडतात.जो बायडन यांना फायझरकडून तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीचा पहिला डोस, देण्यात आला आहे.

अमेरिकेत फायझरच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर संपूर्ण जगासमोर हे वृत्त आलं. देशातील नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी बायडन यांनी लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून स्वत:ला ही लस टोचून घेतली. चिंतेचं कोणतंही कारण नाही, असं म्हणत त्यांनी लस घेतेवेळी देशातील नागरिकांना विश्वास देऊ केला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.