Corona Virus | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Corona Virus | टीम महाराष्ट्र देशा: जगामध्ये कोरोना व्हायरस (Corona Virus) ने पुन्हा थैमान घातले आहे. चीनमध्ये कोरोना वाढत चाललेला असून, भारत आणि जपानच्या सीमेवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी हेल्थ एक्सपर्ट विविध प्रकारचे सल्ले देत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत ठेवावी लागेल हा धडा लोकांनी गेल्या कोरोना महामारीमध्ये शिकला आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले विविध औषधे घेतात. पण या औषधांचा बहुतांश वेळा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नैसर्गिक पद्धतींचा वापर करून प्रतिकारशक्ती वाढवायला पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही बदल करू शकतात. पुढील पदार्थांचा आहारात समावेश केल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत राहू शकते.

पालक

सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे. हिवाळ्यामध्ये बाजारात पालक सहज उपलब्ध होते. अशा परिस्थितीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पालकाचा समावेश करू शकतात. कारण पालकामध्ये विटामिन सी, झिंक आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. हे घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. पालकाच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्तीसोबतच तुमची दृष्टी देखील सुधारू शकते.

अंडी

अंड्यामध्ये पोषक प्रमाणात प्रोटीन, विटामिन, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, मिनरल यासारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करू शकतात. अंड्यांचा नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच, पण त्याबरोबर शरीराला अतिरिक्त ऊर्जा देखील मिळते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही नियमित अंड्यांचे सेवन करू शकतात.

हळद

प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये हळद सहज उपलब्ध असते. हळद अनेक समस्यांवर मात करण्यासाठी उपाय म्हणून वापरली जाते. कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म संसर्गाशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे नियमित हळदीचे सेवन केल्याने तुम्ही सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी रोगांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर हळदीचे नियमित सेवन आणि रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.