Corona Virus | कोरोनासोबत लढण्यासाठी रोजच्या आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Corona Virus | टीम महाराष्ट्र देशा: देशासह जगात अनेक ठिकाणी कोरोना व्हायरस (Corona virus) ने पुन्हा थैमान घातले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ व्हायला लागली होती. रुग्णालय पुन्हा एकदा कोविड रुग्णांनी खचाखच भरायला लागली असून, मृत्यूच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ व्हायला लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सतर्कता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेऊ शकतात. कारण योग्य आहार घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असल्यास आपण या रोगासोबत लढू शकतो. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

कोरोनासोबत (Corona virus) लढण्यासाठी रोजच्या आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

विटामिन सी

अँटिबॉडीज निर्माण करण्यासाठी विटामिन सी मदत करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात विटामिन सी चा समावेश केला पाहिजे. यासाठी तुम्ही मोसंबी, लिंबू, स्ट्रॉबेरी, किवी इत्यादी लिंबूवर्णीय फळांचा आहारामध्ये समावेश करू शकतात. विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही निरोगी राहू शकतात.

विटामिन ई

विटामिन ई हे पोषक तत्व अँटीऑक्सीडेंट म्हणून काम करतो. वनस्पती तेल, सुका मेवा आणि ॲवोकॉडो इत्यादी गोष्टींमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन ई उपलब्ध असते. या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात विटामिन ई चा समावेश केला पाहिजे.

प्रोटीन

शरीरामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये मांस, अंडी, सीफूड, बीन्स, नट्स इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतात.

विटामिन ए

विटामिन ए हे जीवनसत्त्व आतडे आणि श्वसनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करते. शरीराला मुबलक प्रमाणात विटामिन ए प्रदान करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात गाजर, रताळे, पालक, ब्रोकोली, शिमला मिरची इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकतात.

वर नमूद केलेले सर्व पोषक घटक तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. या गोष्टींचा आहारात समावेश केल्याने तुम्ही अनेक आजारांशी लढू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.