कोरोना व्हायरस : चीनमधून भारतीयांची सुटका ; विमानाने आणले परत !

चीनमधील वुहान या शहरामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले तब्बल १००००हुन अधिक लोक आहेत. या व्हायरसने सध्या सम्पूर्ण जगाला हादरवून टाकले आहे.

कोरोना वायरसचा फैलाव रोखण्यासाठी WHOकडून जागतिक आणीबाणी घोषित !

या चीनमध्ये ३२४भारतीय अडकले होते. कोरोना व्हायरसच्या वाढणाऱ्या फैलावामुळे या शहरात संचारबंदी केल्यामुळे हे नागरिक तिथे अडकून पडले होते. त्यांच्याकडील अन्न तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपत आला होता. त्यामुळे या भारतीयांनी इंडियन अँबेसिकडे मदतीची मागणी केली होती.

धक्कादायक बातमी : केरळमध्ये सापडला कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण

या भारतीयांची सुटका करण्यासाठी दिल्ली आणि मुंबईहून दोन विमाने चीनला पाठवण्यात आली होती.या लोकांना घेऊन हे विमान ७.३०वाजता सकाळी दिल्लीमध्ये पोहोचले.विमानतळावर यांची तपासणी करण्यात आली तसेच सध्या त्यांना घरी न पाठवता डॉक्टरांच्या निगराणीखाली दवाखान्यात ठेवले आहे.ज्यांना उपचाराची गरज आहे त्यांना स्पेशल वॉर्ड तयार करून त्यामध्ये ठेवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा