कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव ; अशी घ्या स्वतःची काळजी !

चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १७०हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसची हजारो लोकांना लागण झाली असून, यामुळे जगभरात घबराट पसरली आहे. मात्र या संपूर्ण जगाला हादरवरून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे.केरळमध्ये या व्हायरसची लागण झालेला एक रुग्ण आढळला असून त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत.

जरी भारतामध्ये या व्हायरसने प्रवेश केला असला तरी अजून महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला नाहीये. यासाठी सर्वानी खबरदारीचे उपाय घ्यावेत. सरकारकडून लोकांना स्वतःची काळजी घेण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. डोकेदुखी ,नाक गळणे , खोकला,घसा खवखवणे, ताप येणे ,अस्वस्थ वाटणे, शिंका येणे, धाप लागणे, थकवा जाणवणे,  निमोनिया, फुफ्फुसात सूज इत्यादी सर्व या व्हायरसची  लक्षणे आहेत. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसतात. मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढावू शकतो.या विषाणुची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हवेतून होते.

… आणि कॅप्टन कोहलीला आठवेना ‘हि’ महत्त्वाची नावे  !

कोरोना व्हायरस पासून आपला बचाव करण्यासाठी व्यक्तिगत स्वच्छता सांभाळणे गरजेचे आहे .साबण पाण्याने आपले हात किमान 20 सेकंदपर्यंत धुवावेत. शडांग पनिया या प्रकियेने बनवलेला काढा एका बादलीत भरून ठेऊन तो तहान लागली असता प्यावा. (मुष्ट, परपट, उशीर, चंदन, उदीच्च आणि नागर यांच्या भूकटीचा एक लिटर पाण्यात वापर करून ते निम्मे होईपर्यंत उकळावे, म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण होते. ) हात न धुता आपल्या डोळे, नाक आणि तोंडालगत हात लावू नये.आजारी माणसांचा संसर्ग टाळावा. आजारपणात घरातच रहावे. खोकला किंवा शिंका आल्या असतांना तोंड कपड्याने झाकावे, नंतर हात स्वच्छ धुवावेत. ज्या वस्तूंना स्पर्श झाला आहे त्या वस्तू साफ कराव्यात. प्रवासात किंवा कामकाजाच्या ठिकाणी एन 95 हा मास्क वापरणे सोयीचे ठरेल. या उपाययोजनांचा समावेश आहे.

टाकाऊ प्लास्टिक कचऱ्यापासून बनवला 40 किमी लांबीचा रस्ता !

ज्या लोकांना श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्या जवळपास जाण्यापासून लोकांना मज्जाव करण्यात आला आहे. ज्यांना विषाणूंचा संसर्ग झाला आहे त्यांची भेट घेतल्यावर तातडीने हात धुणे, पाळीव किंवा रानटी प्राण्यापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. कच्चं किंवा अर्धवट शिजलेले मांस खाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.इत्यादी काही गोष्टींचे जर का काटेकोरपणे पालन केले गेले तर नकीच तुम्ही कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून वाचू शकता.

 

महत्वाच्या बातम्या