इचलकरंजीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, एकूण रुग्ण संख्या ५३ वर

कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. इचलकरंजीत आज सकाळी एका ५८ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तीन दिवसापूर्वी उपचारार्थ ‘सीपीआर’मध्ये दाखल केलेल्या या महिलेचा आज पहाटे सहा वाजता मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाचा हा १४ वा बळी ठरला आहे.

मोठी बातमी – पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी !

याचबरोबर इचलकरंजीमधील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५३ वर पोहचली आहे. करोनाला प्रतिबंध करण्यासाठी शहरासाठी योग्य तो कडक निर्णय घ्यावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

पुण्यात दिवसभरात ९३७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद ; एकूण रुग्णसंख्या १९०४२ वर
दरम्यान, इचलकरंजी शहरातील एका लोकप्रतिनिधीच्या घरातील दोन सदस्यांना देखील करोाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शहरात अधिकच खळबळ उडाली आहे. शहरातील नागरिकांनी घरी राहावे सुरक्षित राहावे, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.