सलग दुसऱ्या दिवशीही राज्यात कोरोनाचा हाहाकार ; आढळले तब्बल ‘इतके’ नवीन रूग्ण

ात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चाललेला आहे. आज ात ५३१८ कोरोनाबाधित नवे रूग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे ४४३० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ात आजपर्यंत एकूण ८४,२४५ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४% एवढे झाले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांची साथ महत्वाची-यशोमती ठाकूर

राज्यात आज १६७ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७% एवढा आहे.

आनंदाची बातमी : बुलढाणा जिल्हा झाला कोरोनामुक्त!

राज्यात आज ६७,६०० ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. मुंबईत १४०२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. आतापर्यंत हा आकडा ७४२५२ एकूण कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४१ कोरोनाबाधितांचा मृत्यू आज झाला आहे. असे एकूण ४२८४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.