“कोरोना काळात लोकांची मदत करण्याचा आनंद अभिनयाच्या १९ वर्षाच्या करिअरपेक्षा कित्येक पटीने जास्त”

मुंबई : अभिनेता सोनू सूद लोकांचा मासिहा बनला आहे. गेल्या वर्षापासून सोनू कोरोना काळात अडकलेल्या गरिबांनसाठी पुढाकार घेत आहे. ही मदत करताना त्याला  किती अनुभव मिळाले, काय अडचणी आल्या  याबद्दल आता एका मुलाखतीत सोनूने माहिती दिली आहे.

सोनू सूदने एका मुलाखतीत कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत लोकांना मदत करताना आलेला अनुभव व्यक्त केला. एक अभिनेताच्या भूमिकेपेक्षा कोरोना काळात इतकी प्रसिद्धी मिळेल, याची अपेक्षा होती का? असा प्रश्न विचारल्यानंतर अभिनेता सोनू सूद अगदी प्रामाणिक उत्तर देताना दिसला. तो म्हणाला, “कोरोना काळात लोकांची मदत करताना मला जो आनंद मिळाला तो अभिनयाच्या १९ वर्षाच्या करिअरपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. दीड वर्षापूर्वी जेव्हा मी मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदतीला सुरुवात केली त्यावेळी पुढे जाऊन मी इतक्या गरजूंचे जीव वाचवू शकेल, असा विचार देखील मनात आला नव्हता.”

यावेळी तो कोरोनाच्या पहिल्या लाटेतील आठवणी सांगताना म्हणाला, “ज्यावेळी मी मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करत होतो, त्यावेळी अनेक परवानग्या आणि नियमांचा विचार करावा लागला होता. जरी तुम्ही ३०० लोकांना स्थलांतर करत आहात तर त्या ३०० लोकांची कोरोना चाचणी देखील करणं गरजेचं होतं. त्यातही कोणी बांद्रा तर कोणी अंधेरीत राहणारे होते. त्यामूळे त्यांच्या स्थानिक पोलिस स्टेशनमधून प्रवास करण्यासाठीची परवानगी मिळवणं हे देखील आलं होतं. ही एक खूप मोठी प्रक्रिया होती. अशा परिस्थितीत प्रोटोकॉल आणि काही नियम तोडावे लागतात,” अस सोनू म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा