Coronavirus | जगात अनेक ठिकाणी पुन्हा कोरोनाचा कहर, तर भारतात ‘ही’ स्थिती
Coronavirus | टीम महाराष्ट्र देशा: चीनसह जगामध्ये अनेक ठिकाणी कोरोना व्हायरस (Coronavirus) ने पुन्हा थैमान घातले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ व्हायला लागली. रुग्णालय पुन्हा एकदा कोविड रुग्णांनी खचाखच भरायला लागली असून, मृत्यूच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ व्हायला लागली आहे. तर भारतामध्ये ही परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या आठवड्यामध्ये देशामध्ये केवळ कोरोनामुळे 12 मृत्यु संख्येची नोंद झाली आहे. तर गेल्या 30 दिवसांपासून देशामध्ये एकही कोरोना मृत्यूची घटना समोर आलेली नाही. मार्च 2020 नंतर ही सर्वात कमी नोंद झाली आहे. त्याचवेळी गेल्या आठवड्यामध्ये देशात 1103 नवीन कोरोनाचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. पहिल्या लॉकडाऊननंतर हा सर्वात कमी आकडा नोंदवला गेला आहे.
गेल्या पाच महिन्यापासून देशामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. साप्ताहिक आधारावर, जुलै महिन्यापासून ही घसरण सुरू झाली आहे. जुलैनंतर देशामध्ये प्रत्येक आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येमध्ये घट झाल्याची दिसून आले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात 12 मृत्युसंख्येचा नोंदवला गेलेला आकडा मार्च 2020 नंतरचा सर्वात कमी आकडा आहे.
भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असताना, दुसरीकडे आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 2 नोव्हेंबर रोजी जगभरात 3.3 लाख कोविड रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली होती. त्यानंतर या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत गेली. हा आकडा डिसेंबर 18 नंतर 5.1 लाखांवर पोहोचला आहे.
जपानमध्ये सर्वाधिक कोविड रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. गेल्या सात दिवसांमध्ये जपानमध्ये दहा लाखापेक्षा अधिक नवीन कोविड रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. तर, जपानमध्ये या आठवड्यात 1,600 पेक्षा अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. जपानमधील कोविड मृत्युसंख्येमध्ये 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर दक्षिण कोरीयामध्ये देखील गेल्या आठवड्यामध्ये 450,000 पेक्षा अधिक नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्ण संख्या गेल्या आठवड्यापासून नऊ टक्क्यांनी जास्त आहे. त्याचबरोबर ब्राझील, जर्मनी, हॉंगकॉंग आणि तैवान या ठिकाणी देखील रुग्णसंखेमध्ये वाढ होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- PAK vs ENG | पाकिस्तान संघामध्ये मोठं चक्रीवादळ येण्याची शक्यता, ‘या’ खेळाडूंवर होऊ शकतात परिणाम
- Maharashtra Weather Update | राज्यात थंडीत वाढ, तर तापमानात घट
- Uddhav Thackeray | “आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज होता”; उद्धव ठाकरेंचा पलटवार
- Uddhav Thackeray | “आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा”; उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
- Devendra Fadanvis | ‘लव्ह जिहाद’बाबत महाराष्ट्रातही कायदा होणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Comments are closed.