Coronavirus । चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; अदार पूनावाला यांनी दिला ‘हा’ सल्ला

Coronavirus । पुणे : चीनमध्ये निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोनाचा भडका पाहायला मिळतोय. चीनसह आणखी 5 देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हायरसने चिंता वाढवल्या आहेत. ज्यामध्ये जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Coronavirus Variant) आता भारतात देखील चिंता वाढवत आहे.

याबाबत आता केंद्र सरकारने देखील अलर्ट जारी केला असून येत्या काही दिवसात नवी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. तर याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विट करत ‘घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचं पालन करा’ असं सल्ला दिला आहे.

भारतातील कोरोना स्थितीबाबत बोलताना आदर पुनावाला यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. पुनावाला म्हणाले, की ‘भारतात उत्कृष्ट व्हॅक्स कव्हरेज आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही’. मात्र याचवेळी महाराष्ट्र अलर्टवर असल्याने राज्यातील नागरिकांना मात्र विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज आपल्या देशातील कोरोनाच्या तयारीबाबत बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये कोरोनाच्या परिस्थितींचा आढावा घेण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, ”कोरोना अजूनही संपलेला नाही, कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार राहा”, असं त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.