Coronavirus Update । कोरोना रुग्णसंख्येत वाढ ‘या’ जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्या; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची सूचना

Covid- 19 update | पुणे : सध्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. तर काही राज्यांनी याबाबत मास्क वापरण्याचे संकेत दिले आहेत. तसचं महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याची पाहायला मिळतं आहे. संख्या वाढत असल्याने पुणे, मुंबई आणि ठाण्यासह दहा अतिजोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची सूचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant)
यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

तसचं काल (22 एप्रिल) राज्य सरकारने राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा कोरोना कृती दलाची पुनर्रचना केली आहे. यावेळी सावंत यांनी शनिवारी बैठक घेऊन कृती दलाच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, करोना कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, सदस्य लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. हर्षद ठाकूर, सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये या वेळी उपस्थित होते. तसचं त्यावेळी
डॉ. गंगाखेडकर यांनी अनेक गोष्टी मांडल्या यामध्ये कोरोनाच्या दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवावी. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या सराव प्रात्यक्षिकात (मॉकड्रील) आढळून आलेल्या त्रुटींचे तात्काळ निराकरण करावे. कोरोना रुग्णांना मेटाफॉर्मिन गोळीचा फायदा दिसून येतो. पण या गोळीचा प्रोटोकॉलमध्ये समावेश नाही, असं त्यांनी सांगितलं. तर या गोळीचा रुग्ण बरे होण्यासाठी मदत होत असल्यास त्याबाबतचे संशोधन कृती दलाच्या सदस्यांना उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. अशा सूचनादेखील देण्यात आल्या.

दरम्यान, गेली काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे दिसून येत आहेत. सध्या वाढत असलेला संसर्ग १५ मे पासून कमी होऊ लागेल, असं सर्व सदस्यांनी बैठकीत सांगितलं. यासाठी मास्कचा वापर करणे नागरिकांनी गरजेच आहे असं आवाहन करण्यात यावं. जत्रा, व्यापारी संकुले, चित्रपटगृहे, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या. यामुळे पुणे, मुंबईठाणे या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यकडे लक्ष देण्याचं आव्हान त्यावेळी सावंत यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-