InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘आत्ताचा विरोधी पक्ष हा भ्रष्टाचारी आणि मूर्ख’

- Advertisement -

सध्याचा विरोधी पक्ष हा भ्रष्टाचारी आणि मुर्ख असल्याची टीका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 303 जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळवता आला.

काँग्रेसला मोठा पराभव स्विकारावा लागला, यावरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Loading...

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले की, भाजपाचा अभूतपूर्व विजय झालेला आहे. अशात मला असं वाटतं की देशाला एका चांगल्या, स्वच्छ प्रतिमा असलेल्या, बुद्धीमान विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. यामुळेच लोकशाहीचा आदर राखला जाईल असं मला वाटतं, मात्र सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचाराने बरबटलेला आणि मूर्ख आहे.

- Advertisement -

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.