COVID-19 | देशात कोरोनाचा धोका कायम! 24 तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशातील कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या 10 हजारांपेक्षा अधिक नोंदवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 12,193 नवे रुग्ण आढळले आहे. यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 67,556 वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

काल (21 एप्रिल) देखील देशामध्ये 11,692 कोरोना (COVID-19) रुग्ण आढळून आले होते. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात आत्तापर्यंत 5 लाख 31 हजार 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये 10 हजार 775 कोरोना रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहे.

गुरुवारी (20 एप्रिल) देशामध्ये 40 जणांचा कोरोनामुळे (COVID-19) मृत्यू झाला. यामध्ये 11 रुग्ण केरळमधील होते. तर 6 जणांचा दिल्लीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकी चार मृत्यूची नोंद करण्यात आली. मार्च महिन्यापासून देशातील कोरोना रुग्ण संकेत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

देशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (COVID-19) रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. देशात एका दिवसामध्ये 10 हजाराहून  अधिक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने केले जात आहे. त्याचबरोबर नियमित मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या