COVID -19 | नागरिकांनो सतर्क रहा! देशात 24 तासांत आढळले 10 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

COVID -19 | टीम महाराष्ट्र देशा: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे लोकांच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये 10000 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून सातत्याने केले जात आहे.

24 तासांत आढळले 10 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण (More than 10 thousand corona patients were found in 24 hours)

आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशामध्ये 10,542 नवीन कोरोना (COVID -19) रुग्ण आढळले आहे. जे आधीच्या तुलनेपेक्षा 38 टक्क्यांनी अधिक आहे. या आकडेवारीनंतर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 63,562 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 38 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

भारतामध्ये कोरोना (COVID -19) संसर्गाचा साप्ताहिक दर 5.1 टक्के आहे. त्याचबरोबर, या संसर्गाचा दैनंदिन दर सुमारे 4.39 टक्के आहे. दरम्यान, भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.67 टक्के आहे. तर, कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण 1.18 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईट नुसार, कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 220,66,27,758 लसींचे डोस देण्यात आले आहे.

देशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (COVID -19) रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने केले जात आहे. त्याचबरोबर नियमित मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या