COVID-19 | कोरोनाची लागण झाल्यास ‘ही’ औषध आणि प्लाझ्मा थेरपी टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या (COVID-19 patients) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरताना दिसत आहे. देशामध्ये एका दिवसात हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 129 दिवसांमध्ये ही सर्वाधिक रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोरोना उपचाराबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे.

कोरोनाची लागण झाल्यास ‘या’ औषधांना टाळा (Avoid ‘these’ drugs in case of COVID-19)

देशातील कोरोनाचा (COVID-19) वाढता प्रादुर्भाव बघता आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. कोरोनाच्या प्रौढ रुग्णांच्या उपचारांसाठी बाजारामध्ये ‘लोपीनाविर-रिटोनावीर’, ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’, ‘आयव्हरमेक्टिन’, ‘मोलनुपिराविर’, ‘फॅविपिरावीर’, ‘अझिथ्रोमायसिन’ आणि ‘डॉक्सीसायक्लिन’ इत्यादी औषध उपलब्ध आहे. या औषधांचे सेवन करू नये, असे आरोग्य मंत्रालयाकडून या सूचनेमध्ये सांगण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांनी प्लाझ्मा थेरपी टाळा (Avoid plasma therapy with COVID-19 patients)

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन सूचनेमध्ये कोरोना झाल्यास  (COVID-19) प्लाझ्मा थेरपी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्लाझ्मा थेरेपीसोबतच अँटीबायोटिकचा वापर टाळावा, असे देखील या सूचनेमध्ये सांगण्यात आले आहे.

देशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (COVID-19) रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. देशात एका दिवसामध्ये हजाराहून अधिक रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने केले जात आहे. त्याचबरोबर नियमित मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या