COVID-19 | कोरोनापेक्षा भयंकर महामारी जगात येऊ शकते, जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) इशारा

COVID-19 | जिनिव्हा: जगभरात कोरोना महामारीने जवळपास तीन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. या विषाणूमुळे जवळपास 70 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या महामारीमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोना महामारीतून जग सावरत असताना जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रियेसस यांनी सावधानतेचा गंभीर इशारा दिला आहे.

A virus worse than COVID-19 could hit the world

डॉ. टेड्रोस गेब्रियेसस यांनी जिनिव्हा येथे आयोजित हेल्थ असेंब्लीमध्ये बोलताना कोरोनापेक्षा भयंकर महामारीसाठी जगाने तयार राहावे, असं म्हटलं आहे. साथीचे आजार वाढून मृत्यू वाढू शकतात. त्याचबरोबर कोरोनापेक्षा (COVID-19) भयंकर व्हेरियंट येण्याची शक्यता आहे. यामुळे जगाला पुन्हा एकदा हानी होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी यासाठी सज्ज राहावं, असं त्यांनी सांगितलं आहे.

कोरोना (COVID-19) महामारीमुळे जगभरातील तब्बल 70 लाख लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. मात्र, प्रत्यक्षात मृतांचा आकडा 2 कोटींपेक्षा जास्त आहे, असं डॉ. गेब्रियेसस यांनी सांगितलं आहे. कोरोनामुळे जग बदलले. त्यामुळे पुढील महामारीचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज राहू, असही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, कोरोना (COVID-19) महामारी आणि नवीन व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडा. त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षण असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MXh7RY