घरच्या घरी कोरोना चाचणीसाठी ‘कोव्हिसेल्फ’ संच बाजारात उपलब्ध

पुणे : मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने विकसित केलेल्या ‘कोव्हिसेल्फ’ या चाचणी संचाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) मान्यता मिळाली आहे. घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी हे संच उपयुक्त ठरणार आहे. हा चाचणी संच संपूर्ण भारतीय बनावटीचा आहे.

या प्रक्रियेत बाहेरून येणाऱ्या आरोग्य सेवकाने रुग्णाचा वैद्यकीय नमुना घेण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे यंत्रणेवरील ताण हलका होईल, तसेच संसर्गाचे निदानही लवकर होऊ शकेल. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय स्थानिक औषध दुकानांमध्ये तसेच फ्लिपकार्ट या ई व्यापार संके तस्थळावर ऑनलाइन पद्धतीने हा चाचणी संच खरेदी करणे शक्य आहे.

भारतातील प्रमुख वितरकांकडे हे संच वितरणासाठी सोपवण्यात आले असून प्रति नग २५० रुपये एवढी किं मत निश्चित करण्यात आली आहे. संचाबरोबर माहितीपत्रक, चाचणीसाठी लागणारे साहित्य आणि संच वापरून चाचणी कशी करावी याबाबतचे सूचनापत्र देण्यात आले आहे. नाकातील द्रवाचा वापर चाचणीसाठी केला जाणार आहे. १५ मिनिटांमध्ये रुग्णाच्या संसर्गाचे निदान होणार असून प्रत्येक संच मोबाइल अ‍ॅप्लिकेशनशी जोडलेला असल्यामुळे वापरकत्र्याने भरलेली माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला उपलब्ध होईल.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा