‘Oh My God 2’ चं शूटिंग दरम्यान चित्रपटातील क्रू मेंबर्स कोरोना पोसिटीव्ही

मुंबई : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला ‘ओएमजी: ओ माय गॉड २’ चे शूटिंग सुरू झाले होते. मात्र आता या चित्रपटच्या क्रू मधील ७ सदस्यांची कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे .

या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू होते आणि गेल्या पाच दिवसात ७ लोकांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे चित्रपटाचा निर्माता आश्विन वर्दे याने चित्रपटाचे शूटिंग पुढील दोन आठवड्यांसाठी थांबवले आहे. कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या सदस्यांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी, यामी गौतम आणि दिग्दर्शक अमित राय यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

अश्विनने या आधी ‘कबीर सिंग’, ‘नोटबुक’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्माती केली आहे. ‘ओ माय गॉड २’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, अभिनेत्री यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातही अक्षय कुमार ‘देवा’च्या रुपात दिसणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा