Cricket : ‘हा’ खेळाडू तब्बल ९ वर्ष आणि ३ महिन्यांनी भेटला कुटुंबाला, शेअर केली भावनिक पोस्ट; पाहा PHOTO!

मुंबई : मध्य प्रदेशला पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचा चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा कुमार कार्तिकेय हा त्याचा कुटुंबापासून तब्बल ९ वर्ष ३ महिने दूर राहिला. आयपीएल २०२२ मध्ये तो रोहित शर्माचा संघ मुंबई इंडियन्स कडून खेळायला होता. याच हंगामात तो त्याच्या कामगिरीने छाप पाडण्यात यशस्वी ठरला होता. मात्र तो कुटुंबापासून एवढे दिवस दूर का राहिला. त्याचे एवढे दिवस कुटुंबापासून दूर राहण्याच नेमकं कारण काय? ते आपण जाणून घेऊया..

कुमार कार्तिकेय तब्बल ९ वर्षे कुटुंबापासून दूर का राहिला. खरे तर त्याने क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करण्यासाठी तो आपले कुटुंब, सर्व प्रदेश सोडून दिल्लीला गेला होता. त्याने त्याचवेळी ठरवलं होतं की आता काही झालं तरच घरी परतू. तिथे क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने कारखान्यात काम केले. काही पैसे वाचवण्यासाठी कित्येक मैल पायपीट केली. मध्येच अनेकवेळा आत्मविश्वासही डगमगला, घरच्यांनीही परत बोलावले. पण, त्याच्या निर्धारसमोर सर्व संकटे कमी पडले.

दिल्लीकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. पण, देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सुरुवात मध्य प्रदेश संघातून झाली. येथूनच त्याची मुंबई इंडियन्समध्ये निवड झाली आणि या फिरकीपटूने आयपीएलमध्ये शानदार गोलंदाजी केली. याच वर्षी मुंबईविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही त्याने दमदार कामगिरी करत संघाला प्रथमच चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आईला भेटल्यानंतर कुमार कार्तिकेय झाला भावूक

आता त्याचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे तो ९ वर्ष ३ महिन्यांनंतर कुटुंबाला भेटायला आला. इतक्या वर्षांनी जेव्हा तो आईला भेटला तेव्हा त्याचे हृदय आणि डोळे दोन्ही भरून आले असतील. कदाचित याच कारणामुळे त्याने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला. पण त्याच्या भावना त्याला जगाला सांगता आल्या नाहीत. इतकंच लिहिलं की, ‘९ वर्षे आणि ३ महिन्यांनंतर मी माझ्या आईला आणि कुटुंबाला भेटलो. माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही.

मोहम्मद अर्शद खानच्या जागी डावखुरा फिरकीपटू कुमार कार्तिकेय याला आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी मुंबई संघाने २० लाखांच्या मूळ किमतीत आपल्याकडे घेतले. त्याला आयपीएलमध्ये जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु त्याने खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. त्याने खेळलेल्या ४ डावात ५ बळी मिळविले होते. त्याने आतापर्यंत १२ प्रथम श्रेणी सामन्यात ५५ बळी घेतले आहेत. तसेच ४ वेळा ५ बळी घेण्याची कामगिरी देखील केलेली आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.