InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

cricket

भारतीय संघात तरुण खेळाडूंना संधी द्यायला हवी- गौतम गंभीर

नव्या दमाच्या तरुण खेळाडूंना संधी देण्याबाबत धोनी कायम आग्रही राहिला आहे. भविष्याच्या दृष्टिने त्याने तसा विचार केला. आता आपणही त्याच्याबाबत खूप भावनिक न होता, व्यवहारिक निर्णय घेत तरुण खेळाडूंना संधी द्यायला हवी, असे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला. कसोटीतून धोनी आधीच निवृत्त झालेला आहे. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये जी अखेरची लढत भारतीय संघ खेळला ती धोनीची अखेरची लढत होती, अशी चर्चा आहे.न्यूझीलंडविरुद्ध गमावलेली वर्ल्डकपमधील उपांत्य लढत धोनीची अखेरची वनडे लढत ठरू शकते.येत्या…
Read More...

भारताच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीचा समावेश नाही

भारताच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश नसणार आहे. खुद्द धोनीनेच हे स्पष्ट केले आहे. या वृत्तामुळे भारताचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज या पुढे खेळणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. महेंद्रसिंग धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. पुढील २ महिन्यांसाठी धोनी या रेजिमेंटला वेळ देणार असल्याचे वृत्त आहे.आपण वेस्ट इंडीजला जाणार नसून पुढील दोन महिने रेजिमेंटसोबत घालवणार आहोत असे धोनीने स्वत: सांगितल्याचे एका…
Read More...

सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हॉल ऑफ फेममध्ये समावेश

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून सन्मान केला आहे. हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला सचिन तेंडुलकर हा भारताचा सहावा खेळाडू आहे. याआधी माजी क्रिकेटर बिशनसिंह बेदी, विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव, दिग्गज खेळाडू सुनील गावसकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांचा समावेश झाला होता.सचिनसह दक्षिण अफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू ॲलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटर कॅथरिन फिट्सपॅट्रीक यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे.…
Read More...

नवा कोच निवडताना विराटचे मत विचारणार नाही

भारतीय क्रिकेट संघासाठी नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू झाला आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने जाहीरात देखील दिली आहे. पण यंदा होणारी कोच आणि सपोर्ट स्टाफची निवड गेल्यावेळी सारखी असणार नाही. नवा कोच कोण असणार याची चर्चा सुरू असताना BCCIने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोच निवडीच्या प्रक्रियेतून विराटला बाजूला करण्यात आले आहे. याचाच अर्थ यंदा नवा कोच निवडताना विराटची पसंद किंवा नापसंद विचारत घेतली जाणार नाही.बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या…
Read More...

बीसीसीआयने मागवले नवीन प्रशिक्षक (कोच) पदांसाठी अर्ज

इंग्लंडमधील वर्ल्ड कप स्पर्धेत सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियात मोठे बदल होणार अशी चर्चा सुरू असतानाच आता बीसीसीआयने प्रशिक्षक (कोच) पदांसाठी देखील अर्ज मागवले आहेत. वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत ‘टीम इंडिया’चे आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघातील गटबाजी चव्हाट्यावर आली. त्यामुळे टीम इंडियात संघ आणि संघ व्यपस्थापन अशा दोन्ही भागात बदल होण्याच्या शक्यता बोलल्या जात आहेत.टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकासह बँटिंग कोच, बोलिंग कोच, फिल्डिंग कोच, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंग्थ आणि कंडिशनींग कोच…
Read More...

वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय संघाची शुक्रवारी निवड

वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा 19 जुलैला होणार असून, तीन ऑगस्टपासून सुरू होणार्‍या निर्धारित षटकांच्या मालिकेसाठी महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. विश्‍वचषक उपांत्य फेरीत 9 जुलैला न्यूझीलंडकडून मिळालेल्या पराभवानंतर धोनीच्या भविष्याबाबत चर्चा होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे 38 वर्षीय हा यष्टिरक्षक फलंदाज निवृत्ती घेतो का याकडे सर्वांचे लक्ष आहे.बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने प्रशासकीय समितीच्या (सीओए) मुलाखतीनंतर सांगितले की, निवड समिती 19 जुलैला…
Read More...

मनमानीमुळे भारतीय संघात दुही

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर भारतीय क्रिकेटचे रण पेटले आहे. फलंदाजीची क्रमवारी, त्यावरून कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा एकीकडे सुरू असताना कोहली-शास्त्री यांच्या संघातील मनमानीविरुद्ध संघात दुफळी निर्माण झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरत आहे. फलंदाजीच्या चौथ्या क्रमांकावर अगोदरच वाद झाले आहेत. त्यातच उपांत्य सामन्यात धोनीला खालच्या क्रमांकावर का फलंदाजीस पाठविले, यावरून बीसीसीआयचे पदाधिकारी शास्त्रींवर उघड…
Read More...

क्रिकेट विश्वाला मिळणार आज नवा विजेता

क्रिकेट विश्वाला आज, रविवारी नवा विजेता मिळणार नाहे. आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्डस्वर या खेळाचा जन्मदाता यजमान इंग्लंड आणि नेहमी‘ अंडरडॉग’ मानला गेलेल्या न्यूझीलंड यांच्यात होणार असून, उभय संघ पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक आहेत.इंग्लंडने १९६६ ला फिफा फुटबॉल विश्वचषक जिंकला; पण क्रिकेटची त्यांची झोळी रिकामीच आहे. महिला फुटबॉल संघालादेखील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इओन मोर्गनच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाचा प्रवास चढ-उताराचा राहिला. तरीही हा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून…
Read More...

महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच निर्णय संपूर्ण संघाचा- रवी शास्त्री

विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच निर्णय संपूर्ण संघाचाच होता, असे स्पष्टीकरण भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुखातीवेळी ते बोलत होते.उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. या सामन्यात ७ व्या क्रमांकावर मैदानात उतरलेल्ल्या महेंद्रसिंह धोनीने ५० धावा करून रविंद्र जडेजा (७७) सोबत ११६ धावांची भागीदारी केली. दोघांच्या आक्रमक खेळीने विजयाच्या आशा पल्लवीत…
Read More...