गर्दी केल्याने गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले जातात मग महेबूब शेख यांचे जंगी कार्यक्रम कसे होतात ?

मुंबई: राज्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलय. आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केलेली. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली. गणेशोत्सवकाळात होणारी गर्दी लक्षात घेता या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी काय करता येईल, या महत्त्वाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली होती.

सण-उत्सवापेक्षा घरातील माणूस महत्त्वाचा आहे. आपण सण नंतरही साजरे करू शकतो, सणांपेक्षा लोकांचे प्राण महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उपमुखमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना उत्सवात गर्दी झाल्यास निर्बंध लावण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत दिले.

मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख मात्र या आदेशांना धुडकावत असल्याचे दिसत आहे. तसेच कोरोना नियमांचं उल्लंघनही केले आहे. तसेच शेख यांच्या विविध कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं दिसत आहे. महेबूब शेख यांचे सध्या विविध ठिकाणी दौरे सुरु आहेत. तसेच त्यांच्या कार्यक्रमांना लोक हजेरी लावत असून ठिकठिकाणी जाऊन गर्दी जमवत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, गणपती आगमन मिरवणूक काढल्याप्रकरणी कोल्हापुरातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या 125 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांनी ही कारवाई केली. मंडळाचे संस्थापक माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. याचप्रमाने शेख यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी राज्यातील पोलीस प्रशासनाला दिसत नाही का?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

यावरच आता अगदी गणेश मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला सत्ताधारी नेत्यांवर मात्र पोलीस प्रशासन मेहेरबान आहे का असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिकांवर अशा पद्धतीने पोलिसीखाक्या दाखवला जात असताना शेख यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी राज्यातील पोलीस प्रशासनाला दिसत नाही का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा