InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मराठा आरक्षणावर संकट; न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

- Advertisement -

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याला विरोध करणारी आणखी एक जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. मराठा समाज सधन आहे. त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही, असा दावा याचिकादाराने केला आहे.

मुख्य न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी ही याचिका सादर करण्याची शक्यता आहे. ऍड. संजित शुक्ला यांनी आरक्षणाविरोधात केलेली ही दुसरी याचिका आहे.

- Advertisement -

76 हजार रिक्त पदांच्या मेगाभरतीमध्ये मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचीही मागणी याचिकादाराने केली आहे. मराठा समाज सधन आहे. शेती, सहकार क्षेत्रामध्ये बहुतांश समाज प्रस्थापित आहे. अशा समाजाला सामाजिक किंवा शैक्षणिक मुद्द्यावर आरक्षण मिळू शकत नाही, असा दावा याचिकेत केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.