InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

कंगनाच्या कपाळावर तलवारीचा घाव

पडले तब्बल 15 टाके

वेबटीम : मणिकर्णिका चित्रपटाच्या शुटिंग सेटवर कंगना रनोटबरोबर गंभीर अपघात झाला असून त्यात तिच्या कपाळावर तब्बल15 टाके पडले आहेत.अपघातानंतर कंगनाला लगेचच अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. सध्या कंगना आयसीसीयूमध्ये अॅडमिट आहे. तिला सुमारे आठवडाभर रुग्णालयात राहावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कंगना कशी झाली जखमी
Loading...
हैदराबादमध्ये सध्या मणिकर्णिका चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. यावेळी अॅक्टर निहार पांड्याबरोबर कंगना एका सीनचे शूट करत होती. यामध्ये निहार जेव्हा तलवार फिरवतो, तेव्हा कंगनाला खाली झुकायचे होते. पण कंगनाचे खाली झुकण्याचे टायमिंग चुकल्यामुळे तलवार कंगनाच्या भुवयांच्या मधोमध लागली. त्यात तिला गंभीर जखम झाल्याने लगेचच तिला रुग्णालयात नेण्यात आले. कंगना थोडक्यात बचावली असे डॉक्टरांनी सांगितले आहे. कारण घाव कंगणाच्या भुवयांच्या मध्ये आणि कपाळावर लागला. हाडाची दुखापत थोडक्यात टळली असे डॉक्टर म्हणाले.
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.