मुख्यमंत्री होते पण लाचार होऊन मंत्रिमंडळात मंत्री झाले, सरपंचाचा शिपाई झाला; सदाभाऊ खोतांचा चव्हाणांना टोला

नांदेड : भाजपाने देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर या देगलूर बिलोली मतदारसंघात पोट निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सुभाष साबणे आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित प्रवेश देण्यात आला आहे.

भाजपाच्या पक्षप्रवेशात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. अशोक चव्हाण हा भाग्यवान माणूस, पण सरपंचाचा शिपाई झाला. मुख्यमंत्री होते पण लाचार होऊन मंत्रिमंडळात मंत्री झाले, असा टोला सदाभाऊ खोत यांनी चव्हाणांना लगावलाय.

तसेच, सरकारमधील लोक नोटा मोजून थकली. या पोटनिवडणुकीत पैशांचा महापूर येणार आहे. लक्ष्मी आली की दरवाजा उघडा ठेवा. हे शपथ मागतात तेव्हा खोटी शपथ घ्यायची. मशीनने मोजलेले पैसे घ्यायचे, पण मतदान साबणेंना द्यायचं, असं आवाहन खोत यांनी देगलूरमधील मतदारांना केलंय.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा