InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पीक विमा योजनेच्या निकषात हवी करायला हवी – किशोर तिवारी

पीक विमा योजना त्रुटीपूर्ण असल्याने, शेतकऱ्यांचा आक्रोश कमी करण्यासाठी सरकारने पीक विमा योजनेच्या निकषात सुधारणा करण्याची गरज आहे, असे मत वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
दुष्काळी परिस्थिती असूनही बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी पीक विम्याच्या निकषात तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

त्यामध्ये सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि कोरडवाहू शेतकºयांसाठी पीक विमा योजनेत वेगवेगळे निकष ठरविण्याची गरज आहे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक नुकसान भरपाईसाठी २४ तासांत पीक नुकसानाचे पंचनामे करणे आणि ४८ तासांत पीक नुकसान भरपाई शेतकºयांना मिळाली पाहिजे, अशा प्रकारची सुधारणा सरकारने पीक विमा योजनेच्या निकषात करणे आवश्यक आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply