InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अबब ! सरकारनं तुमचा डेटा विकून कमावले कोट्यवधी रुपये

मोदी सरकारने व्हेईकल रजिस्ट्रेशन आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा डाटा विकून कमाईला सुरुवात केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच व्हेईकल डाटा विकण्याच्या धोरणाला कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत दिलेल्या लिखित उत्तरात याचा खुलासा केला आहे.

सरकारनं आतापर्यंत डाटा विकून 65 कोटींची कमाई केली आहे. सरकारनं आतापर्यंत 87 खासगी कंपन्या आणि 32 सरकारी कंपन्यांना वाहनांचा डाटा विकला आहे. बल्क डाटा शेअरिंग धोरणानुसार खासगी कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांना डाटा एक्सेसची परवानगी दिली जाते. यासाठी शैक्षणिक संस्थेकडून एका वर्षासाठी 3 कोटी रुपये आणि सरकारी संस्थांकडून 5 कोटी रुपये घेतले जातात.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply