InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अरुणा धरण प्रकल्पात कोट्यवधीचा घोटाळा; राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी

सिंधुदुर्गातील वैभववाडीत सुरु असलेल्या अरुणा धरण प्रकल्पाच्या कामात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी हायकोर्टाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कामामुळे तीन गाव पाण्याखाली जाणार असून 1800 प्रकल्पाग्रस्तांचे पुनर्वसन न करताच धरण बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे, असा आरोप करत स्थानिक रहिवासी तानाजी कांबळे यांनी ऍड. आशिष गिरी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या प्रकल्पाला 2005 मध्ये पाटबंधारे विभागाकडून मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 2007 पासून प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी शासनाने 2005 मध्ये 54 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र आता या प्रकल्पाचा खर्च 1600 कोटी रुपयांवर गेला आहे. ज्यातील सुमारे एक हजार कोटी खर्च झाल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply