CSK vs GT | IPL फायनलच्या राखीव दिवशी पाऊस आला, तर ‘हा’ संघ ठरणार विजयी
CSK vs GT | अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना काल (28 मे) खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झालेला असून आज (29 मे) हा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. मात्र, आज देखील सामान्यदरम्यान पाऊस आल्यावर कोणत्या संघाच्या नावावर विजयाचा शिक्कामोर्तब होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
If CSK vs GT match is cancelled, GT will win
आजही अहमदाबादच्या मैदानावर पाऊस आला आणि सामना रद्द (CSK vs GT) झाला, तर ही चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ठरू शकते. कारण साखळी फेरी अखेर गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला विजयी घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्स हा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विजयाच्या शिक्कामोर्तब गुजरातच्या नावावर होऊ शकतो.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सोमवारी शहरातील वातावरण ढगाळ असेल. त्याचबरोबर तीन टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये रविवार एवढा पाऊस सोमवारी नक्कीच पडणार नाही. मात्र, सोमवारी देखील पाऊस आयपीएलचा अंतिम सामना (CSK vs GT) रद्द करू शकतो.
दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामन्यामध्ये (CSK vs GT) पावसाने धुमाकूळ घातला. संततधार पावसामुळे रविवारी (28 मे) नाणेफेकही होऊ शकली नाही. त्यामुळे हा सामना राखीव दिवशी (29 मे) होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- IPL Final | आयपीएल फायनलच्या राखीव दिवशी पडणार पाऊस? पाहा हवामान अंदाज
- Devendra Fadnavis | “सावरकर बनण्याची तुमची औकात नाही”; देवेंद्र फडणवीसांची गांधींवर टीका
- Amol Mitkari | ज्याच्या तोंडात 24 तास विष असतं तो विषारीच बोलणार- अमोल मिटकरी
- Gautami Patil | मराठा संघटनेला सुषमा अंधारेंचा विरोध तर गौतमी पाटीलला फुल्ल सपोर्ट
- Beed Collecter | बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांबरोबर वाळू माफियांचा ॲक्शन सीन; टिप्पर घालून मारण्याचा प्रयत्न
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3WDLkbH
Comments are closed.