InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे मुंबईतील पूल कोसळला ?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल कोसळल्याने 6 जणांना प्राण गमावावा लागला. या दुर्घटनेत 20 हून अधिक लोक जखमी झाले. या  नंतर मुख्य अभियंता ए.आर.पाटील आणि सहाय्यक एस.एफ. काकुळते यांचे निंलबन करण्यात आले.

दरम्यान, हा पूल स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे कोसळल्याचा संशय पालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.पूल आकर्षक दिसावा यासाठी त्यावरील लाद्या बदलण्याचे आणि पुलाची रंगरंगोटी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पुलावर आकर्षक अशा लाद्या बसविण्यात आल्या. या कामासाठी सुमारे १४ लाख रुपये खर्च करण्यात आले.  यामुळे पुलावरील भार वाढला आणि पूल कोसळला असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 14 लाख रुपयांचा खर्च करताना पुलावर वाढणाऱ्या भाराची मात्र कोणतीही काळजी घेतली गेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.