राहुल गांधीं बरोबरच अशोक चव्हाण देखील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता?

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर कार्यकारिणीची आज बैठक होत आहे. या बैठकीत निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात. राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पी.चिदंबरम, सिद्धरामय्या, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, कॅप्टन अमरिंदर सिंह, आरपीएन सिंह यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही पदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत चव्हाणांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परिणामी त्यांचा पराभव झाला. यामुळे चव्हाण राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. 2014 मध्ये मोदी लाटेतही यांनी नांदेडची जागा जिंकली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.