CWG 2022 : भारताच्या खात्यात आणखी पदकांची कमाई, आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने !

मुंबई : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी सुरूच आहे. २८ जुलैपासून सुरू झालेल्या या खेळांमध्ये भारतीय खेळाडू आपली पूर्ण ताकद लावताना दिसत आहेत. भारतीय खेळाडूंनी जिथे अनेक खेळांमध्ये इतिहास रचला आहे, तिथे त्यांना अनेक ठिकाणी निराशेचाही सामना करावा लागला आहे. आतापर्यंत या स्पर्धेत वेटलिफ्टर्सचा दबदबा राहिला असून त्यांनी भारतासाठी एकूण १० पदके जिंकली आहेत.

पहिल्या ६ दिवसांत भारताच्या खात्यात एकूण १८ पदके जमा झाली आहेत. यामध्ये पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. खेळाडूंचा हा प्रवास अजून बाकी आहे आणि भारतातील अनेक मोठे कार्यक्रम आणि खेळाडू पदार्पण करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यावेळी २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान कॉमनवेल्थ गेम्सचे सत्र सुरू आहे. जगभरातील सुमारे ७२ देश यात सहभागी झाले आहेत. भारतातून २१३ खेळाडू यात सहभागी झालेले आहेत.

आतापर्यंत भारताने १८ पैकी सर्वाधिक १० पदके वेटलिफ्टिंगमध्ये जिंकली आहेत. सातव्या दिवशी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने होतील. हा सामना बॅडमिंटनच्या महिला एकेरीत आकर्षी कश्यप आणि पाकिस्तानच्या माहूर शहजाद यांच्यात होणार आहे. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतचा सामना ( 4 PM), महिला एकेरीत आकर्षीचा सामना पाकिस्तानच्या माहूर शहजादशी (10 PM) या वेळेत खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.