Cyber Crime | पोलिस म्हणून आला अन् 7 लाख रुपये घेऊन गेला, जाणून घ्या नक्की काय प्रकरण?
Cyber Crime | पुणे: आजच्या युगात सायबर क्राईमच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. अशात पुण्यामध्ये असाच प्रकार घडल्याचं दिसलं आहे. पुणे शहरातील एका 27 वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून तब्बल 7 लाख रुपये गायब झाले आहे. या महिलेने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
A cyber criminal pretending to be a policeman stole Rs 7 lakh from a woman
पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार (Cyber Crime), या महिलेला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. ही व्यक्ती त्या महिलेसोबत बनावटी पोलीस म्हणून संवाद साधत होती. तुमचे मला पार्सल मिळाले आहे, असं तो व्यक्ती फोनवर म्हणाला. हे पार्सल जर तुमचे नसेल, तर तुम्हाला हे पोलिसांना सांगावे लागेल.
बनावटी पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला स्वाईप एप्लीकेशन डाउनलोड करायला सांगितले. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कॉलद्वारे त्याने तिचे आधार कार्ड तपशील घेतले. तुमचे आधार कार्ड चार गुन्हेगार वापरत आहे, अशी माहिती त्या अज्ञात व्यक्तीने महिलेला दिली. त्यानंतर त्याने महिलेला बँक खाते व्हेरिफाय करायला सांगितले. मग काही क्षणात त्या महिलेच्या बँक अकाउंटमधून तब्बल 6.99 लाख रुपये गायब झाले.
दरम्यान, दिवसेंदिवस सायबर क्राईम (Cyber Crime) वाढत चालला आहे. या गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. मात्र, आपल्याला देखील या सर्व घटनेपासून सावध राहायला हवे. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला आपली माहिती देण्यापूर्वी संबंधित तपास करूनच माहिती शेअर करावी. त्याचबरोबर कुणीही आपला मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड मागितल्यास पूर्ण तपशील करूनच माहिती द्यावी. संशयित व्यक्तीसोबत कधीच वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
महत्वाच्या बातम्या
- Rashtriya Swayamsevak Sangh | राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला- कॉँग्रेस
- Aadhar Card Update | मोफत आधार कार्ड अपडेटची शेवटची संधी! ‘या’ तारखेपर्यंत आहे वेळ
- Western Dress | तुळजापूरनंतर पुण्यातील मंदिरात वेस्टर्न कपड्यांना बंदी
- Gautami Patil | “बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे…”; गौतमी पाटीलबद्दची शाहीर संभाजी भगत यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
- BGMI Update | Gamers साठी आनंदाची बातमी! लोकप्रिय गेम BGMI पुन्हा होणार प्ले स्टोअरवर उपलब्ध
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3IJ3lje
Comments are closed.