InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता

- Advertisement -

अरबी समुद्रात रविवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ते आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे़. या कमी दाबाच्या पट्ट्याने आता दिशा बदलली असून ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे.

या चक्रीवादळाचे १२ जून रोजी तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. १३ व १४ जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे़.

- Advertisement -

सोमवारी सकाळी हा कमी दाबाचा पट्टा लक्षद्वीपच्या अमिनी दिवीपासून २५० किमी, मुंबईपासून ७६० किमी तर गुजरातच्या वेरावळपासून ९३० किमी अंतरावर होता़. मंगळवारी त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे़. यामुळे केरळ, कर्नाटकाची किनारपट्टी, गोवा, कोकणात ११ ते १४ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.

११ जूनला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ६५ ते ७५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़. त्यात वाढ होऊन १३ जूनला गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात वाऱ्याचा वेग ताशी ११० ते १२० किमी इतका असण्याची शक्यता आहे़. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे़.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.