D K Shivakumar |मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित; तर डी के शिवकुमार यांना राहुल गांधींची ‘ही’ ऑफर

D K Shivakumar | कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असणार या चर्चांना पूर्णविराम लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज (17 मे) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची डी के शिवकुमार (D K Shivakumar) आणि सिद्धरामय्या यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान सुमारे तासभर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरमय्या यांचं नाव अंतिम करण्यात आलं आहे. तर डी के शिवकुमार यांना राहुल गांधी यांनी ऑफर दिली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

राहुल गांधींची डी के शिवकुमार यांना ‘ही’ ऑफर

उपमुख्यमंत्रीपद आणि सहा खात्यांची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल ही ऑफर राहुल गांधी यांनी डी के शिवकुमार दिला आहे. दोन्ही नेत्यांसोबत राहुल गांधी यांची स्वतंत्र चर्चा झाली असून सिद्धरामय्या यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. तर शिवकुमार त्यांच्याशी तासाभराहून अधिक वेळ चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी देखील दोन्ही नेत्यांनी खरगेची भेट घेतली.

दरम्यान, जर डी के शिवकुमार यांनी जर राहुल गांधी यांची ऑफर स्वीकारली तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांचा शपथविधी शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे. यामुळे डी के शिवकुमार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे . तसचं खरगे यांनी सोमवारी पक्षाच्या तिन्ही निरीक्षकांशी चर्चाही केली होती. निरीक्षकांनीही त्यांच्या मताच्या आधारे आमदारांना अहवाल सादर केला होता. यावरून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original news – https://bit.ly/3Ohww0g

You might also like

Comments are closed.