D K Shivkumar | डी के शिवकुमार यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण

D K Shivkumar | बंगळुरू : नुकतीच कर्नाटक विधानसभा निवडणुक पार पडली आहे. यामध्ये काँग्रेसला (Congress) बहुमत मिळालं आहे. तर आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार (D K Shivkumar) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यापैकी कुणाला मुख्यमंत्रिपद द्यायचं यावरून अजूनही चर्चा सुरू आहेत. अशातच डी के शिवकुमार यांनी एक वक्तव्य केलं असल्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) तणाव निर्माण झालाय.

काय म्हणाले डी के शिवकुमार

डी के शिवकुमार म्हणाले की, सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यावेळी मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असं डी के शिवकुमार म्हणाले. यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर आणखी एका आमदाराने दावा केला आहे. काँग्रेसचे नेते जी परमेश्वर यांनी देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, माझ्यासोबत 50 आमदार आहेत. परंतु पदासाठी पुढं-पुढं करणं मला जमत नाही. यामुळे मी शांत आहे. पण याचाच अर्थ मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असा होत नाही. मनात आणलं तर मी काहीही करू शकतो. असं जी परमेश्वर यांनी म्हटलं आहे. यामुळे कर्नाटक मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नक्की कोण असेल? आगामी निवडणूकीच्या दृष्टीने कोणाचं पारडं जड असेल असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

You might also like