Dada Bhuse | “तुमचे अजून दुधाचे दात पडले नाही…”; दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

Dada Bhuse | मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहे. यामध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाला चांगलंच धारेवर धरलं आहे.

आता मुख्यमंत्र्यांची (एकनाथ शिंदे) निरोपाची वेळ आली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Everyone should be aware of their age while speaking – Dada Bhuse

आदित्य ठाकरे यांना उत्तर देत दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले, “बोलताना प्रत्येकानं आपल्या वयाचं भान ठेवायला हवं. त्याचबरोबर प्रत्येकानं आपलं वय बघून वागायला हवं.

आपल्याला अजून भरपूर लांबचा पल्ला गाठायचा आहे. तुमचे (आदित्य ठाकरे) अजून दुधाचे दात पडले नाही. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या मर्यादेचं भान ठेवून बोललं पाहिजे.”

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलेल्या निधीवर बोलताना दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले, “सूचनेप्रमाणे लोकप्रतिनिधींना त्यांचा निधी मिळाला आहे. वाटप करताना काही झालं असतं तर माध्यमानं  ते सर्वात पहिले शोधून काढलं असतं.

प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. सकाळपासून बैठका घ्यायच्या आणि मग त्यावर निर्णय घ्यायचा ही अजित पवारांची पद्धत आहे.”

“अजित पवार मुख्यमंत्री होणार या सर्व अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण असं काही होणार नाही”, अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर दादा भुसे (Dada Bhuse) यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या  बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Drxpgf